Pune Crime | लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत ‘हायटेक’ स्टाईलनं कॉपी, औरंगाबादमधील उमेदवार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा (electronics gadgets) वापर करण्यास परवानगी नसताना गॅझेटद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला पुणे पोलिसांच्या (Pune Crime) स्वारगेट पोलिसांनी (Swargate police) अटक केली आहे. या गॅझेटद्वारे मित्राशी बोलून तो प्रश्न पत्रिकेमधील प्रश्नांचे उत्तर लिहून घेत होता. मुन्नाभाई चित्रपटातील नायक देखील अशा प्रकारे कॉपी करत होता. परंतु खऱ्या आयुष्यातील मुन्नाभाईला जेलची हवा (Pune Crime) खावी लागणार आहे.

 

जीवन फंडुसिंग गुणसिंगे (रा. वैजापुर, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस भरतीसाठी (Railway Police Recruitment) रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूलमध्ये (Kataria High School) असलेल्या केंद्रामध्ये जीवन गुणसिंग याचा नंबर आला होता. दुपारी तो परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यासाठी केंद्रामध्ये गेला. यावेळी तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने जवळ कोणतीही वस्तू नसल्याचे सांगितले होते.

 

परीक्षा सुरु झाल्यानेतर गुणसिंग याने इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईद्वारे मित्राला संपर्क साधला.
मित्राला प्रश्न सांगून त्याच्याकडून उत्तर घेऊन लिहित होता. उत्तरे लिहित असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिसांनी गॅझेट जप्त करुन त्याला अटक (Pune Crime) केली.
हे एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस असून त्यामध्ये सिमकार्ड टाकून कॉल करण्याची सोय असून या द्वारे तो कॉपी करत होता.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले (PSI Hanumant Bhosle) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | cheating made using electronic gadgets in railway police Recruitment examinations candidate from aurangabad arrested by swargate police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

Shivsena Vs Devendra Fadnavis | भाजपकडून पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर; शिवसेनेची सामनातून टीका

Pune News | दीपावलीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आदेश