Pune Crime | 29 लाखांच्या वार्षिक पॅकेजच्या नोकरीचे आमिष दाखवून 43 लाखांना घातला गंडा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  लुपीन कंपनीमध्ये वार्षिक २९ लाख रुपयांची नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने एका मध्यमवयीन गृहस्थाला सायबर चोरट्यांनी (cyber thief) तब्बल ४३ लाख ६२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी एका ४८ वर्षाच्या नागरिकाने बारामती तालुका पोलीस (Baramati Taluka Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमन वर्मा आणि दर्शन पालकर अशी नावे सांगणाºयांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. Pune Crime | cheating of Rs 43 lakh by showing the lure of an annual package job of Rs 29 lakh

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सध्या एका ठिकाणी नोकरी करतात.
त्यांना १ जुलै २०२० रोजी एक मोबाईल फोन आला.
त्यावरुन त्यांना लुपीन लिमिटेड या कंपनीमध्ये २९ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेली प्रॉडक्शन मॅनेजर या पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखविले.
त्यांना सुरुवातीला काही रक्कम भरायला लावली. त्यानंतर त्यांना लुपीन कंपनीचे बनावट नियुक्ती पत्र देऊन वेळोवेळी मुलाखतीसाठी ट्रेनिंगच्या नावाखाली पैसे भरायला लावले.
त्यानंतर बाँड अ‍ॅग्रीमेंट पॉलिसी व जीएसटी अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरायला सांगितले.
सायबर चोरटे सांगतील त्यानुसार फिर्यादी यांनी वेळोवेळी ४३ लाख ६२ हजार ९०६ रुपये भरले.
तरीही नोकरीचे काही काम न झाल्याने शेवटी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली़ पोलीस निरीक्षक ढवाण तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | cheating of Rs 43 lakh by showing the lure of an annual package job of Rs 29 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न रॅकेट प्रकरणी ‘शर्लिन -पूनम’ यांना हायकोर्टाचा दिलासा

Corona Delta Variant | लसीकरणानंतर सुद्धा लोकांना का होतोय डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Coronavirus in India | दिलासादायक ! देशात गेल्या 24 तासात 42363 रुग्ण कोरोनामुक्त; देशातील आतापर्यंत 44 कोटी लोकांचे लसीकरण