Advt.

Pune Crime | पुण्यातील पोलिस निरीक्षकाची फसवणूक, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अंमली पदार्थ व अग्नीशस्त्रांची टिप देत असल्याचे भासवून एकाने चक्क पुण्यातील पोलीस निरीक्षकास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. खलीलउल्ला आयनुल्ला खान (Khalilullaha Aiyanulla Khan) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dengle) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden police station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक यांना १० डिसेंबर रोजी खान याने फोन करुन पोलीस बातमीदार (Police Informer)असल्याची बतावणी केली. दोघे जण मुंबईवरुन (Mumbai) त्यांचे गाडीमध्ये पिस्टल व चरस हा अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची बातमी देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्या बातमीच्या मोबदल्यात त्यांच्याकडून फोन पेद्वारे ५ हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात बातमी न देता पोलीस निरीक्षक व इतरांची फसवणूक केली.

या खान याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही दिवस बंडगार्डन परिसरात नाकाबंदी (Nakabandi in Pune) केली. गुप्तपणे पाळत ठेवली होती. प्रत्यक्षात ही बातमी खोटी होती. त्यामुळे पोलिसांनी फसवणूक केल्याबद्दल खान याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Cheating with Pune Police Inspector, Bundgarden police booked Khalilullaha Aiyanulla Khan in fraud case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख