Pune Crime | कौटुंबिक वादातून 3 वर्षाच्या चिमुकल्याला विष पाजून संपवलं; न्यायालयानं आईला दिली आयुष्यभराची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कौटुंबिक वादाच्या (family dispute) कारणातून आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला विषारी (poision) औषध पाजून त्याचा खून (Murder) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) तळवडे येथे 2 ऑगस्ट 2016 मध्ये घडली होती. या प्रकरणाची पाच वर्षे सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. न्यायालयाने आईला दोषी ठरवत जन्मठेपेची (lifetime imprisonment) शिक्षा सुनावली आहे. तसेच 7 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल सत्र न्यायाधीश जी पी अगरवाल (Sessions Judge G. P. Agarwal) यांनी सुनावला.

 

स्वाती विक्रम माळवदकर Swati Vikram Malwadkar (वय-25 रा. तळवडे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तळवडे येथे 2 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर Shrikant Malwadkar (वय-30) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) फिर्याद दिली होती. त्यानुसार स्वाती विरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला होता.

 

घटनेच्या एक वर्ष आधी फिर्यादी व त्यांचा भाऊ विक्रम आणि आई-वडील असे सर्व एकत्र राहत होते. परंतु स्वातीला ते मान्य नसल्याने तिचे सासू-सासरे गावी राहू लागले होते. मात्र, सर्वांनी एकत्र रहावे, अशी विक्रम यांची इच्छा होती. त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्यात वाद झाले होते.

घटनेच्या दिवशी स्वाती हिने विक्रम यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे विक्रम यांनी फिर्यादी यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना पुतण्या निशिगंध अंथरुणात झोपलेला दिसला. तर त्यांची वहिनी स्वाती ही घरात बेशुद्ध पडलेली होती आणि पंख्याला साडी बांधलेली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल (Pune Crime) केले. परंतु डॉक्टरांनी पुतण्याला मृत घोषीत केले. तर स्वातीवर उपचार करुन तिला डिस्चार्ज देण्यात आला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक (Public Prosecutor Leena Pathak) यांनी पाहिले. त्यांना अ‍ॅड. मनोज बिडकर (Adv. Manoj Bidkar) यांनी मदत केली.

 

Web Title :-  Pune Crime | child killed poision drug court mother life imprisonment pune shivajinagar court Sessions Judge G. P. Agarwal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ayushman Bharat | नगरसेवक दीपक पोटेंच्या माध्यमातून ‘आयुषमान भारत’ योजनेचे भाजप शहराध्यक्षांच्या हस्ते कार्ड वाटप; जगदीश मुळीक म्हणाले – ‘आघाडी सरकारची सर्वसामान्यांसाठी एकतरी योजना आहे का?’

Indonesia Masters Badminton Championships | पी.व्ही सिंधू, किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Anna Hazare | केंद्राकडून कृषी कायदे मागे ! अण्णा हजारेंकडून PM मोदींचे आभार तर विरोधकांना टोला