Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! मुलांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा लावणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील दोन नराधम मुलांनी आपल्या वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती हडप करण्यासाठी जन्मदात्या आईचा अमानुष छळ (Inhuman Persecution of Mother) केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या नराधम दोन तरुणांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिला घराबाहेर देखील काढलं आहे. याप्रकरणी पीडित आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिलीय. यावरून त्या दोघांवर पोलिसांनी घरगुती हिंसाचारासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा (Pune Crime) दाखल केलाय.

याबाबत माहिती अशी, मुन्नवर अब्बास अली नईमाबादी (Munnavar Abbas Ali Naimabadi) (वय, 57) असं पीडित महिलेचं नाव आहे. त्या गृहिणी असून पुण्यातील सिनेगाँग रोड परिसरातील गीता हाऊसिंग सोसायटीत राहायला आहेत. तर अहेमद अब्बास अली नईमाबादी (Ahmed Abbas Ali Naimabadi) (वय, 39) आणि हुसेन अब्बास अली नईमाबादी (Hussein Abbas Ali Naimabadi) (वय, 32) अशी नराधम मुलांची नावे आहेत. या प्रकरणावरून पोलिसांनी पीडित महिलेची नणंद आणि दीर यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

Nitin Landge Bribe Case | PCMC स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगेंना ‘या’ तारखेपर्यंत अंतरिम जामीन, लांडगेंच्या PA सह इतर चौघांबाबत कोर्टानं दिला ‘हा’ निर्णय

संबंधित आरोपींनी पीडित महिलेच्या नावावर असणारं घर बळकवण्यासाठी गेल्या काही काळापासून
तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. आरोपींनी संपत्तीमधील आईचा हिस्सा काढून
घेण्यासाठी हा छळ केला आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी आरोपीनं आपल्या आईचाच छळ केलाय.
तसेच कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईनं सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून द्यावा, यासाठी पीडितेच्या
मुलांनी आणि अन्य नईमाबादी कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केलीय. दरम्यान, पीडित महिलेनं
कोऱ्या स्टॅप पेपरवर स्वाक्षरी करायला नकार दिल्यानं आरोपी मुलानं आईला खुर्ची फेकून मारली आहे.

दरम्यान, नराधम मुलाच्या हल्ल्यानंतर पीडित महिला खाली कोसळल्यानंतर घरातील इतर कुटुंबीयांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केलीय. या हल्ल्यामध्ये ती जखमी झालीय. याच अवस्थेत त्या नाना पेठेतील (Nana Peth) आपल्या बंधूच्या घरी आल्या आहेत. दरम्यान आरोपी मुलाने पीडित महिलेचं घर बळकावलं आहे. याप्रकरणी पीडितेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा

Health Insurance Reimbursement Claim | कसा दाखल करावा आरोग्य विमा प्रतिपूर्ती दावा, जाणून घ्या पूर्ण पद्धत

SIP Mutual Funds | 17500 रुपये गुंतवून तुम्ही सुद्धा बनू शकता 5 कोटीचे मालक, जाणून घ्या कसे


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | children beat mother for property domestic violence case in bundgarden police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update