Pune Crime | महिलेवर चाकूने वार करुन जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पाणी पिण्याचा बहाणा करुन महिलेवर चाकूने वार करुन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या (snatched gold ornaments) चोरट्याला (thief) नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी (दि.7) पुण्यातील (Pune Crime) वाघोली (Wagholi News) येथील केसनंद रोडवरील (Kesnand Phata) एपिक सोसायटीत घडली. आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाने (Pune Police Crime Branch) ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे (Rishikesh Vyavahare) व ऋषिकेश ताकवणे (Rishikesh Takawane) यांना माहिती मिळाली की, वाघोली (Wagholi) येथील एपिक सोसायटीमध्ये एका व्यक्तीने घरात घुसून एका महिलेवर चाकूने वार करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आहेत. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी चोरी करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी पकडून ठेवले होते. लोकांच्या ताब्यातून पळून जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आईच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी सोसायटीमधील प्लॅटमध्ये पिण्यास पाणी मागण्याच्या बहाणा करुन महिलेवर चाकूने वार करुन दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikanda Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil),
पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले (PSI Sudhir Tengle), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे,
कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे,
सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Citizens arrested a thief who stabbed a woman and robbed her pune police crime branch wagholi kesnand phata lonikand police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | गेल्या 24 तासात पुणे शहरात ‘कोरोना’चे 100 रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Bigg Boss 15 | भाड्याचा नवरा म्हणणाऱ्या अभिजीतवर भडकली राखी सावंत

Pune Crime | कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले