Pune Crime | महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळवून नेणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडले

Pune Crime | Citizens caught the thief who snatched the purse from the woman's hand and fled
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून दुचाकीवरुन पळून जाणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या (Pune Crime) हवाली केले.

राहुल राजेंद्र पवार (वय 20, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना वडगाव शेरी येथील आनंदपार्क (anand park wadgaon sheri) येथील रोडवर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणार्‍या एका 52 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात Chandan Nagar Police Station (गु. र. नं. ३००/२१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांची सून आणि नात हे बाजारासाठी जात होते.
यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील छोटी पर्स हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आरोपीचा तोल गेल्यामुळे तो दुचाकीवरुन खाली पडला. यावेळी नागरिकांनी चोरट्याला पकडून ठेवले.
याची माहिती चंदननगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याला (Pune Crime) ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निीरक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Citizens caught the thief who snatched the purse from the woman’s hand and fled

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतीज्ञापत्र, NDA नंतर RIMC आणि RMS मध्ये सुद्धा मुलींना मिळणार प्रवेश

Earn Money | घरबसल्या फक्त 5000 रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल मोठी कमाई; जाणून घ्या कशी करावी सुरुवात?

Pune News | महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तरच आमची जास्त ‘ताकद’ – जयंत पाटील (व्हिडीओ)

Total
0
Shares
Related Posts