Pune Crime | कोंढव्यात सिव्हिल इंजिनियरचे ठोसा मारुन पाडले दात, ठेकेदारासह दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बांधकाम साईटवर (Construction Site) केलेल्या कामाचे बिल (Work Bill) स्विकारण्यावरुन ठेकेदार (Contractor) आणि त्याच्या मुलाने बांधकाम साईटच्या सिव्हिल इंजिनियरला (Civil Engineer) मारहाण (Pune Crime) केली. या मारहाणीत (Beating) सिव्हिल इंजिनियरचे दात पडले. हा प्रकार कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) येथील प्रकृती पॅलॅडियम बांधकाम साईटच्या (Prakruti Palladium Construction Site) ऑफिससमोर मंगळवारी (दि.29) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. पोलिसांनी (Pune Police) दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा (FIr) दाखल केला आहे.

 

सचिन रामलाल कुंकुलोळ Sachin Ramlal Kunkulol (वय-51 रा. हनुमान मंदिरासमोर, उरुळी कांचन गाव, ता. हवेली) असे जखमी झालेल्या सिव्हिल इंजिनियरचे नाव असून त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ठेकेदार विद्यासागर चौधरी Vidyasagar Chaudhary (वय-50) आणि त्यांचा मुलगा (नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील पुण्यधाम आश्रमरोडवर प्रकृती पॅलॅडियम बांधकाम साईट असून
या ठिकाणी फिर्यादी हे सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी फिर्यादी हे बांधकाम साईटच्या कार्यालयासमोर उभे होते.
त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी बांधकाम साईडच्या स्लाइडींग खिडक्यांच्या केलेल्या कामाचे बिल फिर्यादी यांच्याकडे दिले.
मात्र फिर्यादी यांनी कंपनी मालकाला विचारुन बिल स्विकारतो असे सांगितले. यावरुन ठेकेदार आणि त्याच्या मुलाने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तसेच फिर्यादी यांच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये त्यांचे दोन दात पडले.
तसेच आरोपींनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Civil engineer’s teeth smashed in Kondhwa, FIR against both including contractor incident happen in front of Prakruti Palladium Construction Site

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora Bralette Photo | नियॉन कलरची ब्रा घालून रस्तावर फिरताना दिसली मलाइका अरोरा, फोटो झाले व्हायरल

 

Aurangabad Crime | अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस ! प्रेयसीच्या पतीचे कंबरेपासून केले दोन तुकडे, औरंगाबादमधील थरकाप उडवणारी घटना

 

Compulsory Helmet Rule In Pune | पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा – कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख