Pune Crime | येरवडा कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी; हवालदारास मारहाण

पुणे : Pune Crime | खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरीच्या खूनांमध्ये येरवडा कारागृहात (Yerwada Jail) असलेल्या कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह हवालदाराला या कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. (Pune Crime)

याबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे Police Constable Hanumant More (वय ५८) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२५/२२) दिली आहे.

त्यानुसार समीर शकील शेख (Sameer Shakeel Sheikh), तंरग राकेश परदेशी (Tanrag Rakesh Pardeshi), निलेश श्रीकांत गायकवाड (Nilesh Srikanth Gaikwad), पुरुषोत्तम राजेंद्र वीर (Purushottam Rajendra Veer), देवा नानासो जाधव (God Nanaso Jadhav) अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरंग परदेशी हा नवी खडकी येथील गुंड असून त्याच्यावर तरुणावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली आहे.
तर पुरुषोत्तम वीर व त्याच्या साथीदारांनी मांजरी परिसरात दरोडा टाकला होता.
त्यांचा दरोडा व इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.

हे सर्व पाचही जण वेगवेगळ्या टोळ्यांमधील असून त्यांच्यात सोमवारी सकाळी ८ वाजता भांडणे झाली.
तेव्हा समीर शेख, तरंग परदेशी, निलेश गायकवाड हे बंद खोलीतील कैद्यांच्या दिशेने फरशी व दगडाचे तुकडे
फेकून मारत होते. तेव्हा फिर्यादी व त्यांचे सहकारी तेथे कर्तव्य बजावत होते. फिर्यादी यांनी या तिघांना
दगडफेक करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना हाताने पायाने मारहाण केली.
पुरुषोत्तम वीर व देवा जाधव यांनी त्यांना मारहाण करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावरही सरकारी
कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे
(Sub-Inspector of Police Kate) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Clashes between inmates in Yerawada Jails; Beating the constable

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adarsh Shinde | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या उत्कर्षसाठी आदर्श शिंदेनी लिहिली पोस्ट, म्हणाला….

Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | बदली करण्यात आलेल्या 6 पोलीस अधिकाऱ्यांची नव्याने पदस्थापना; DCP नम्रता पाटील, श्वेता खेडकर, तिरुपती काकडे यांचा समावेश

Bank Strike | ‘या’ तारखेला देशभरातील बँकांचा संप, ATM सह इतर सेवांवरही परिणाम होऊ शकतो