Pune Crime | वन खात्याची जमीन बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले MPDA कायद्याखाली स्थानबद्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वानवडी (Wanwadi), हडपसर (Hadapsar), कोंढवा (Kondhwa) परिसरातील वन खात्याची (Forest Department) व इतर सरकारी मालकीची जमिनीची बेकादेशीर विक्री करणार्‍या गुन्हेगारावर (Pune Criminals) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. अशा प्रकारे जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये लोकांची व शासनाची फसवणूक (Cheating With Government) करणार्‍यावर प्रथमच कारवाई झाली आहे. (Pune Crime)

 

राज गुलाब शेख (वय २९, रा. इंदिरानगर, हांडेवाडी रोड, हडपसर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने साथीदारांसह वानवडी, हडपसर व कोंढवा परिसरात वन खात्याची व इतर सरकारी मालकीच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री, खंडणी (Ransom), दुखापत, दुखापतीसह दंगा, शासनाच्या मालकीची जागा विकून फसवणूक, घराविषयक आगळीक, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे (Illegal Weapon) या सारखे ७ गुन्हे (Pune Crime) दाखल होते.

या परिसरात त्याच्या गैरकृत्यांमुळे लोकांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झालेला असून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.
त्यामुळे वानवडी पोलीस ठाण्याचे (Wanwadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड (Senior Police Inspector Deepak Lagad),
पी़ सी़ बी़ गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude)
यांनी प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta)
यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन राज शेख याला एक वर्षासाठी औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात (Aurangabad Harsul Jail) स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
गेल्या दीड वर्षामध्ये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ५८ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Commissioner of Police Amitabh Gupta action on the person who sells forest department land illegally under MPDA Act

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा