×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | कंपनी मालकाने महिला कर्मचार्‍याच्या घरी जाऊन केली अश्लिल शिवीगाळ; कोरेगाव...

Pune Crime | कंपनी मालकाने महिला कर्मचार्‍याच्या घरी जाऊन केली अश्लिल शिवीगाळ; कोरेगाव पार्कमधील पॉश सोसायटीतील घटना

पुणे : Pune Crime | कंपनीत कामाला असताना वारंवार फोन करुन व WhatsApp वर संदेश पाठवून त्रास देत असल्याने एका तरुणीने कंपनीत जाणे बंद केले. तेव्हा कंपनीच्या मालकाने घरी येऊन सोसायटीमध्ये मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन अश्लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १००/२२) दिली आहे. (Pune Crime)

त्यानुसार पोलिसांनी अनिकेत रवींद्र वर्टी Aniket Ravindra Varti (रा. मारवेल  ऑरम, गल्ली नं. ७, कोरेगाव पार्क) याच्यावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ आगस्ट पासून सुरु होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोपी अनिकेत वर्टी याच्या कंपनीत कामाला होत्या.
तो फिर्यादी यांना विनाकारण वारंवार फोन करुन व्हॉटसअ‍ॅपवर संदेश पाठवून त्रास देत होता.
त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी २७ ऑगस्टपासून कंपनीत जाणे बंद केले होते.
त्यानंतर फिर्यादी या त्यांचे मित्र, मैत्रिणीसह घरी असताना अनिकेत वर्टी हा फोन करत होता.
त्यांनी फोन न घेतल्याने तो त्यांच्या घराबाहेर आला. त्याने दरवाजा वाजवला.
तेव्हा फिर्यादी तरुणीने तो आलेला पाहून दरवाजा उघडला नाही.
त्यानंतर त्याने मोठ मोठ्याने आरडाओरडा करुन फिर्यादी यांना अश्लिल शिवीगाळ केली.
तसेच अश्लिल व्हॉटसअ‍ॅप संदेश पाठवून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
त्यामुळे अनिकेत वर्टी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भुजबळ (PI Bhujbal) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Company owner visits female employee’s home and sexually abuses her; An incident in a posh society in Koregaon Park

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | नियोजित पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाचे अपहरण करुन केली बेदम मारहाण; सिंहगड रोड पोलीस ठाण्यात FIR

Devendra Fadnavis | पीएफआयवर बंदी घालणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना

CM Eknath Shinde | ‘मिशन’ सोपे नव्हते, फडणवीसांना प्रत्यक्ष भेटायचो, दूरध्वनीवरून बोलणे शक्यच नव्हते, कारण आमचे दूरध्वनी टॅप…, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या आठवणी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News