Pune Crime | अटकेनंतर छाती दुखीची तक्रार ! पुणे सीआयडीनं अ‍ॅड. सागर सुर्यवंशीला केलं ससून रूग्णालयात भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरासह (Pune Crime) इतर ठिकाणी दाखल असलेल्या 11 गंभीर गुन्ह्यातील आरोपी अ‍ॅड. सागर मारूती उर्फ राजाभाऊ सुर्यवंशी (Adv. Sagar Maruti alias Rajabhau Suryavanshi) याला पुणे सीआयडीने (CID) शुक्रवार पेठेतून अटक केली. अटक (Pune Crime) केल्यानंतर सुर्यवंशी याने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला तातडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीआयडीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (CID SP Srikant Dhivare) यांनी सांगितले की, सीआयडीने ॲड. सूर्यवंशी याला शुक्रवारी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी अटक (Arrest) केली. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याने छातीत दुखत (Chest pain) असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्याच्या तक्रारीनुसार डॉक्टरांनी त्याला दाखल (Admit) करुन घेतले आहे. तसे न्यायालयाला कळविण्यात आले असल्याचे श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

 

काय आहे प्रकरण ?

अ‍ॅड. सागर सुर्यवंशी याच्यावर पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police Station) तसेच पिंपरी (Pimpri Police Station), भोसरी एमआयडीसी (Bhosari Police Station) आणि नवघर पोलिस ठाण्यात (navghar police station) गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जमिनीच्या (Land Scam) संदर्भात फसवणूक (Cheating) आणि इतर गंभीर गुन्हयांचा त्यामध्ये समावेश आहे. पुण्याच्या (Pune Crime) शिवाजीनगर न्यायालयाकडून (Shivajinagar Court) त्याला फरारी (Abscond criminal Adv. sagar Suryavanshi) घोषित करण्यात आले होते. तसेच उच्च न्यायालयाने गेल्या 3 वर्षापासून फरार असलेला अ‍ॅड. सुर्यवंशीला का अटक होत नाही अशी विचारणा देखील सीआयडीकडे केली होती.

सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार (CID Addl DGP Riteish Kumar),
पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे (IG Makrand Ranade) यांनी अ‍ॅड. सुर्यवंशीवर कारवाई करण्यासंदर्भात पुण्याच्या सीआयडीला आदेश दिले होते.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Superintendent of Police Shrikant Dhivare) आणि
त्यांची टीम गेल्या काही दिवसांपासुन अ‍ॅड. सुर्यवंशीची माहिती काढत होती. दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (SP Shrikant Dhivare)
यांच्या टीममधील पोलिस निरीक्षक बाबर आणि पोलिस कर्मचारी देसाई तसेच दोरगे यांना
अ‍ॅड. सुर्यवंशी हा रेणुका मातेचा भक्त असून तो दर्शनासाठी रात्री दहा वाजता पुण्याच्या शुक्रवार पेठेतील (shukrawar peth) रेणुका माता मंदिर (Renuka Mata Temple) येथे येणार असल्याची गोपनिय माहित मिळाली.

अप्पर पोलिस महासंचालक रितेश कुमार, महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,
पोलिस निरीक्षक बाबर, पोलिस कर्मचारी देसाई, दोरगे आणि इतर सहकार्‍यांनी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीला पुण्याच्या शुक्रवार पेठेतून अटक केली आहे.
त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलिस ठाण्यात 4, शिवाजीनगरमध्ये 2, हिंजवडी
आणि नवघर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक आणि इतर 2 असे एकुण 11 गुन्हे अ‍ॅड. सागर सुर्यवंशीविरूध्द दाखल आहेत.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडीचे पोलिस अधिकारी करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Complaint of chest pain after arrest! Pune CID sned adv Sagar Suryavanshi in Sassoon Hospital pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील गणेश पेठ पोलीस चौकीसमोर एकाच्या डोक्यात फरशी घालून खून

High Court | हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ‘दलित व्यक्तीने क्रॉस घातल्यास किंवा चर्चमध्ये गेल्यास जात प्रमाणपत्र…’

Mumbai Police Cyber Cell | मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून CBI चे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना ‘समन्स’