Pune Crime | 14 व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, 4 ठेकेदारांवर FIR; बाणेर मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नियोजित गृहप्रकल्पाच्या चौदाव्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी चार ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना (Pune Crime) 30 नोव्हेंबर रोजी बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्ता भागात घडली.

 

शाम नेवा रवीदास (वय-22 रा. नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार लज्जाराम गुजर, रामकेश गुजर, रवी गवंडे, अजिंक्य यांच्यावर दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवेंद्रकुमार (वय-28) याने फिर्य़ाद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील पॅनकर्ड क्लब रस्त्यावर एका नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे.
मयत शाम रवीदास हा इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील बाल्कनीत फरशी बसवण्याचे काम करत होता.
त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो चौदाव्या मजल्यावरून खाली पडला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडली.
याला जबाबदार असणाऱ्या चार ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | construction worker dies after falling from 14th floor in baner pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..