Pune Crime | बिल्डरच्या कार्यालयासमोर ठेकेदाराची आत्महत्या ! राजेश अगरवाल, संतोष अगरवाल, राहुल भंडारी, अजित गायकवाड, अभिजीत गायकवाड, सचिन किल्लेदार, ललित जैन यांच्यासह 8 जणांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | बिल्डरकडून ठेकेदारी पद्धतीने केलेल्या कामाचे पैसे बिल्डरने दिले नसल्याने ठेकेदाराने दोन दिवस ठिय्या मांडला होता. दोन दिवस ठिय्या मांडूनही बिल्डरने (builder) पैसे दिले नसल्याने ठेकेदाराने (contractor) विषारी औषध पिऊन आत्महत्या (commits suicide) केली. हा धक्कादायक प्रकार चिंचवड स्टेशन (Chinchwad station) येथे बुधवारी (दि.25) सकाळी घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) 8 जणांविरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

प्रविण पंडीत पाटील (Pravin Pandit Patil) असे आत्महत्या करणाऱ्या ठेकेदाराचे नाव आहे.
याप्रकरणी राजेश जगदीशप्रसाद अगरवाल Rajesh Jagdish Prasad Agarwal, संतोष रामअवतार अगरवाल Santosh Ramavatar Agarwal, राहुल भंडारी Rahul Bhandari, अजित सुभाष गायकवाड Ajit Subhash Gaikwad, अभिजीत गायकवाड Abhijeet Gaikwad,
सचिन किल्लेदार Sachin Killedar, ललित जैन Lalit Jain यांच्यासह 8 जणांवर निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मयत प्रविण पाटील यांचे मेहूणा विनोद भाऊराव पाटील (वय-48 रा. बंगला नं.9, झेड.पी. कॉलनी, नॅशनल हायवे नं. 6, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण पाटील यांनी गुन्हा दाखल झालेल्यांकडून ठेकेदारी पद्धतीने काम घेतले होते.
त्यापोटी त्यांच्याकडून प्रवीण यांना 1 कोटी 94 लाख 1 हजार 616 रुपये येणे होते.
गुन्हा दाखल झालेल्यांनी काम झाल्यानंतरही प्रविण यांचे पैसे दिले नाही.
आपल्या कामाचे पैसे घेण्यासाठी प्रविण यांनी गुन्हा दाखल झालेल्यांकडे वारंवार पाठपुरावा केला.
परंतु अगरवाल यांच्यासह त्यांच्या इतरांनीत्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली.

 

अखेर प्रवीण पाटील यांनी अगरवाल यांच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयासमोर (builders office) मंगळवार (दि.24) पासून ठिय्या मांडला होता.
दिवसभर थांबून देखील अगरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैसे दिले नाहीत.
त्यामुळे प्रवीण यांनी बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास विषारी औषध प्राषण केले.
त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रवीण पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
यामध्ये त्यांनी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे लिहली आहेत.
त्यांच्या चिठ्ठीवरुन पोलिसांनी 8 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय फसवणूक आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Contractor commits suicide in front of builder’s office! FIR against 8 persons including Rajesh Agarwal, Santosh Agarwal, Rahul Bhandari, Ajit Gaikwad, Abhijeet Gaikwad, Sachin Killedar, Lalit Jain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Government | ठाकरे सरकारकडून राज्यातील लाखो अधिकार्‍यांना मोठा दिलासा ! मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 6 महत्वपूर्ण निर्णय

JEE Main-NEET 2021 | नीट आणि जेईई मेनच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, यावेळी नियमांमध्ये झाले ‘हे’ बदल, जाणून घ्या

Pune Crime | गारवा बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार करुन फरार झालेले आरोपी गजाआड