Pune Crime | ‘ऑनलाईन क्लास’वरुन वाद ! मुलाचा मोबाईल तोडला आणि पत्नीला केली बेदम मारहाण; कोंढव्यातील घटना

पुणे : Pune Crime | कोरोना संसर्गामुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. मुलांचे शिक्षण सध्या ऑनलाईन चालू आहे. मुले घरातच असल्याने पालकांचे त्यांच्या ऑनलाईन शिक्षणावरुन वादावादी वाढली आहे. पण एका वडिलांचा या ऑनलाईन शिक्षणावरुन पारा इतका वाढला की त्याने मुलाच्या हातातून मोबाईल घेऊन तो तोडून टाकला. त्याला शांत करण्याचा प्रयत्न केलेल्या पत्नीला रॉडने मारहाण करुन कॅरम बोर्ड डोक्यात मारुन जखमी केले़. हा प्रकार कोंढव्यातील (Kondhwa) पारगेनगर येथील हिलटॉप बिल्डींगमध्ये २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडला.

याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. या कुटुंबातील ५ वर्षाच्या मुलाचा ऑनलाईन क्लास सुरु होता. त्यावेळी त्याच्या वडिलाने ५ वर्षाच्या मुलाला रागावून ‘‘तू टाईमपास कर रहा है़ तुम्हारा पढाई पे ध्यान नही है़ मै तेरा मोबाईल फोड डालुंगा’’ असे म्हणून त्याचा मोबाईल बंद करुन खाली टाकला. बाथरुमधील पाण्याचे बकेटमध्ये तोडून नुकसान केले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना शांत रहा असे सांगितल्यावर त्याने पत्नीला हाताने, तोंडावर व नाकारवर मारहाण केली. यावरच घराचे खिडकीचे पडद्याचा कर्टन रॉड काढून त्या रॉडने पत्नीला बेदम मारहाण केली. घरामध्ये ठेवलेला कॅरम बोर्ड उचलून तिच्या डोक्यात मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे (Police Sub Inspector Prabhakar Kapure) तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

SBI ने सुरक्षित ऑनलाइन बँकिंगसाठी Yono Lite App मध्ये दिले एक नवीन फीचर, जाणून घ्या डिटेल

Maharashtra Unlock | राज्यातील 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Controversy over ‘online class’! Broke the boy’s mobile and beat his wife to death; Incidents in Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update