Pune Crime | व्हेलमाशाची एक कोटीची उलटी पाठवली कुरियरने, दोघांना अटक

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेकायदेशीरपणे व्हेल माशाची उलटी (whale fish vomit) विक्रीसाठी कुरियरने (courier) पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने (Pimpri Chinchwad Crime Branch Unit One) तिघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.

 

जॉन सुनिल साठे John Sunil Sathe (वय-33 रा. मगरमळा, साईनगर, गोरेवाडी नाशिक रोड), अजित हुकुमचंद बामगार Ajit Hukumchand Bamgar (वय-61 रा. 778, गोरेग्राम लेन, चांदी गणपती मंदिरामागे, रविवार कारंजा, नाशिक) यांना अटक केली आहे. तर मनोज अली Manoj Ali (रा. भिवंडी नाशिक फाटा, पिंजारवाडी) याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत (Wildlife Conservation Act) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई प्रमोद रोहिदास गर्जे Pramod Rohidas Garje (वय-33) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित आणि मनोज या दोघांनी आरोपी जॉन याला कुरियरने व्हेल माशाची उलटी पाठवली.
आरोपी जॉन हा व्हेल माशाची ही उलटी बेकायदेशीरपणे विकणार होता. याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने मोशी टोलनाका (Moshi Toll Naka) येथे सोमवारी सकाळी 11 वाजता सापळा रचून आरोपी जॉनला ताब्यात घेतले.
आरोपींकडून पोलिसांनी 1 कोटी 10 लाख रुपये किमतीची व्हेल माशाची 550 ग्रॅम वजनाची उलटी जप्त केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील (Police Inspector Varsharani Patil) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | courier sends 1 crore worth whale fish vomit pimpri chinchwad police crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता देखील अनिल देशमुखांच्या वाटेनेच जाणार’ – किरीट सोमय्या

Kolhapur Crime | ‘आई, घरी सोडतो’ असं म्हणत महिलेला गाडीत बसवलं, काही अंतर गेल्यानंतर दाम्पत्याने महिलेसोबत केला भयंकर प्रकार; कोल्हापुरातील खळबळजनक घटना

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौर्‍यावर येणार

Army Helicopter Crash | तमिळनाडूमधील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं ! हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत पत्नीसह इतर 9 जण असल्याची माहिती; दोघांचा मृत्यू (व्हिडीओ)