Pune Crime | घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयानं दिला ‘समेट’साठी वेळ, फारकतीच्या कालावधीत 27 वर्षीय पत्नीवर 32 वर्षीय पतीचा ‘बलात्कार’

पुणे : Pune Crime | पती पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल, त्यांना काही कालावधीसाठी वेगळे राहण्यास कौटुंबिक न्यायालयाकडून (family court) सांगण्यात येते. या कालावधीत जर त्यांच्या समेट झाला नाही तर पुढे त्यांच्या घटस्फोटाला (divorce) मान्यता दिली जाते. या फारकतीच्या काळात पत्नी वेगळी रहात असताना पती तिच्या घरी गेला व तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. पत्नीबरोबर संसार करण्यास तयार नाही, पण केवळ उपभोगासाठी पत्नी हवी असलेल्या या पतीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police station) बलात्कारासह (Rape) कौटुंबिक छळाचा (domestic violence) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याप्रकरणी कात्रज (Katraj, Pune) येथील एका २७ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (६९७/२१) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी वडगाव बुद्रुक येथे राहणार्‍या ३२ वर्षाच्या पती व त्याच्या आईविरुद्ध ४९८, ३७६ (ब), ३२३, ५०४, ४०६, ३४ अशा कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
हा शारीरीक व मानसिक छळ आणि शारीरीक जबरदस्तीचा हा प्रकार १४ नोव्हेबर २०१६ पासून आतापर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि सासु यांनी फिर्यादीस घर नावावर करुन त्यावर कर्ज काढण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली.
घरगुती कारणावरुन फिर्यादीचा शारीरीक व मानसिक छळ करुन पतीने फिर्यादीस वेगळे ठेवले.
फिर्यादीविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा (Pune Crime) दाखल केला.
हा दावा कोर्टामध्ये प्रलंबित असतानादेखील फिर्यादीच्या घरी येऊन फारकतीच्या कालावधीत
फिर्यादीसोबत वेळोवेळी इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले, म्हणून गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Kolhapur Crime | मुंबई पोलीस दलातील पोलिसाने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इयत्ता 10 वी ची मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

Pune Police |  पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Court grants time for reconciliation after filing for divorce, 32-year-old husband rapes 27-year-old wife during divorce

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update