पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime Court News | बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल (Jai Prakash Goyal) यांची जमीन खरेदी विक्रीत फसवणूक (Cheating Fraud Case) करणार्यास कॅन्टोंमेंट न्यायालयाचे (Lashkar Court Pune) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए ए कुलकर्णी (Judge A A Kulkarni) यांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचुलक्यावर जामीन मंजूर केली आहे.
हेमंत बागरेड्डी मोटाडु Hemant Bagreddy Motadu (रा. वानवडी) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हेमंत मोटाडु आणि नोटरी प्रमोद शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी यास्मिन फैम सय्यद यांच्याकडून खरेदी खताने सर्वे नं. ७५१ मौजे वानवडी येथील जमीन खरेदी केली.
आरोपीनी या मिळकतीचे मुळ मालक रेवरंड फादर मोर्शलिन्सु सबस्टेटियम न्यूनस यांच्याबरोबर २६ जून १९९७ रोजी करारनामा करुन २७ जून १९९७ रोजी कधीही रद्द न होणारे कुलमुख्यत्यार पत्र तयार केले असून ते नोटरी प्रमोद शर्मा यांनी नोटरी केली. प्रत्यक्षात शर्मा यांना २१ जुलै १९९७ रोजी सनद मिळाली. त्याच्या अगोदरच शर्मा यांनी सनद मिळण्यापूर्वी हेमंत मोटाडु याच्याशी संगनमत करुन कुलमुख्यत्यार बनावट तयार करुन त्यावर बनावट शिक्के तयार करुन ते दस्त्यावर उमटवून त्यामध्ये लिहिलेला दस्त खरा आहे, असे नमूद करुन फिर्यादीची फसवणूक केली.
आरोपीच्या वतीने अॅड. अमेय सिरसीकर (Adv Amey Sirsikar) यांनी न्यायालयात बाजू मांडली. फिर्यादी यांनी ज्या व्यक्तीकडून ही जमीन विकत घेतली आहे. त्या व्यक्तीला न्यायालयाने २०१६ मध्ये जमिनीची मुळ मालक रेवरंड फादर मोर्शलिन्सु सबस्टेटियम न्यूनस यांचे बनावट मृत्युपत्र तयार करण्याच्या आरोपात शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी व आरोपी यामध्ये खूप वर्षांपासून दिवाणी दावा न्यायालयात प्रलंबित आहे. एप्रिल २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने दिवाणी खटल्यात यथास्थिती राखण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे फिर्यादी हे दिवाणी स्वरुपाच्या खटल्याला फौजदारी वळण देण्याकरीता व आरोपी यांच्यावर दबाव टाकण्याकरीता ही खोटी फिर्याद ऑक्टोबर २०१७ मध्ये दिली आहे. याप्रकरणात पोलिसांनी फायनल रिपोर्ट दाखल केला आहे. आरोपी तपासात सहकार्य करायला तयार आहेत, असा युक्तीवाद अॅड. अमेय सिरसीकर यांनी केला. तो ग्राह्य धरुन अटी शर्तीवर न्यायालयाने हेमंत बागरेड्डी मोटाडु याचा जामीन मंजूर केला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Puja Khedkar | पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा; IAS पद परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा