पुणे : Pune Crime Court News | पत्नीच्या प्रियकराला साथीदारांच्या मदतीने मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला. बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली होती. न्यायालयाने ९ महिन्यानंतर पतीचा जामीन मंजूर केला. (Murder Case)
नितीन बाळासाहेब रेणुसे (रा. बिबवेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. संग्राम हनुमंत साळुंखे (वय २२, रा. वडकेनगर, बारामती) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे.
बिबवेवाडी परिसरात राहणार्या रेणुसे याच्या पत्नीशी संग्राम साळुंखे याचे प्रेमसंबंध होते. संग्राम हा तिला भेटण्यासाठी बिबवेवाडी १ डिसेंबर २०२३ रोजी आला होता. तेव्हा बाळासाहेब रेणुसे व त्याच्या साथीदारांनी संग्राम साळुंखे याला मोटारसायकलवर बसवून अप्पर बिबवेवाडी येथील गॅस गोडाऊनच्या मैदानात नेले. संग्राम याच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा त्याचे पोटात आहे. त्याचे ऑपरेशन होणार आहे, हे माहिती असूनही आरोपींनी त्याच्या डोक्यात तसेच शरीरावर ठिकठिकाणी हाताने व कठीण वस्तूने मारहाण करुन जखमी केले. त्यात त्याचा मृत्यु झाला. (Pune Crime Court News)
आरोपीच्या वतीने अॅड. प्रसाद रेणुसे (Adv Prasad Renuse) यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
संग्राम याच्या डोक्याला जुनी गंभीर दुखापत होती. घटनेच्यावेळी तो पूर्णत: गांजा व दारुच्या नशेत होता.
आरोपीला फक्त संशयावरुन अटक केली आहे, असा युक्तीवाद अॅड. दादासाहेब भोईटे (Adv. Dadasaheb Bhoite) व अॅड. प्रसाद रेणुसे यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी (Judge P.R. Chowdhary) यांनी जामीन मंजूर केला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा