Pune Crime | डॉक्टर पतीला डॉक्टर पत्नीला पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | डॉक्टर पतीला त्याच्या डॉक्टर पत्नी (Doctor wife) व मुलांसाठी पोटगी (Alimony) देण्याचे आदेश पुणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Magistrate) जोंधळे यांच्या न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाने डॉक्टर पतीला (Doctor husband) 15 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पत्नीला तिच्या पतीसोबत घरात राहण्याचा अधिकार असल्याने तिला बेकायदेशीररीत्या घरातून बेदखल करु नये तसेच तिच्यावर घरगुती हिंसाचार (Domestic violence) करु नयेत असे आदेश पती आणि त्याच्या नातेवाईकांना न्यायालयाने दिल्याची माहिती अ‍ॅड. विजय ठोंबरे (Adv. Vijay Thombre) यांनी दिली. (Pune Crime)

 

काय आहे प्रकरण?

 

या प्रकरणात डॉक्टर महिलेचा विवाह एका डॉक्टरशी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. परंतु मुलगी झाल्याचा राग मनात धरून व पैशांच्या लालसेपोटी पतीने पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून महिलेने प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी जोंधळे (Magistrate Jondhale) यांच्या न्यायालयात (court) धाव घेतली. महिलेच्या वतीने अ‍ॅड ठोंबरे यांनी युक्तीवाद करुन पोटगीची मागणी केली. (Pune Crime)

 

वकीलांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने डॉक्टर पत्नीचा अंतरिम पोटगीचा अर्ज मंजूर केला. तसेच महिलेला व मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्याचे आदेश पती आणि त्याच्या नातेवाईकांना दिला. तसेच पत्नी ही कमावणारी स्त्री असली तरी तिला वागविण्याची व त्यांच्या राहणीमानाप्रमाणे तिला पोटगी देण्याची जबाबदारी ही पतीवर असते असे कोर्टाने आदेशात नमूद केलेले आहे.

 

Web Title : Pune Crime | Court orders doctor’s husband to pay alimony to doctor’s wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

UPSC Recruitment 2021 | भारत सरकारच्या विविध विभागात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, पगार देखील लाखात

ST Workers Strike | ‘विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही’

WhatsApp New Features | व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटमध्ये लवकरच येतील 8 नवीन फिचर्स, वापर करणे होईल आणखी सोपे; जाणून घ्या