Pune Crime | अलिशान गाडी स्वस्तात देण्याच्या बहाण्याने उकळले 43 लाख, 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | एका गुन्हयात जप्त केलेली अलिशान विदेशी बनावटीची कार कमी किंमतीत मिळवून देण्याची बतावणी करुन लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. याप्रकरणामध्ये एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याचा (Fake IPS officer) समावेश आहे. याबाबत 5 जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने समर्थ पोलिसांना (samarth police station) दिला आहे.

यासंदर्भात रौनक दिलीप ओसवाल Raunak Dilip Oswal (रा. पदमजी पार्क, भवानी पेठ) यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
त्यानुसार उस्मान हाशमुददीन तांबोळी, अर्शद उस्मान तांबोळी, मन्सूर अब्दुल गफूर सय्यद
(तिघे रा. पदमजी पार्क, भवानी पेठ) हमीद सय्यद आणि अहमद सय्यद (दोघे रा. भवानी पेठ)
यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश सोमवारी (दि. 30 ऑगस्ट) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर (First Class Magistrate Janhvi Kelkar) यांनी दिला आहे.

न्यायालयामध्ये दखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, रौनक औसवाल यांचे आणि तांबोळी व सय्यद यांचे जुने कौटुंबिक संबंध आहेत.
एका गुन्हयात जप्त केलेली ‘पोर्शे’ (Porsche car) ही दोन कोटी रुपयांची गाडी 50 लाखात मिळवून देण्याचे आमिष ओसवाल यांना दाखवून 43 लाख रुपये घेतले.
गाडी मिळवून देण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रशांत सूर्यवंशी (Prashant Suryavanshi) हे प्रयत्न करणार होते. त्यांनी सूर्यवंशी यांची ओळख ओसलवाल यांच्यासोबत करुन दिली होती.
43 लाख रुपये देऊनही गाडी मिळाली नाही.
तसेच सुर्यवंशी हा तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे ओसवाल यांच्या लक्षात आले.

 

या प्रकरणामध्ये ओसवाल यांनी समर्थ पोलीस ठाण्यात 15 जून रोजी फसवणूक (Fraud), खंडणी (extortion) आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली.
याशिवाय पोलीस आयुक्तलयात (Pune Police Commissionerate) देखील अर्ज दिला.
तांबोळी तसेच सय्यद याच्याकडून मानसिक व शारिरीक त्रास सुरु राहिल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली. अ‍ॅड. सेउल शहा (Adv. Seoul shaha) यांनी ओसवाल यांच्यातर्फे न्यायालयात युक्तीवाद केला.
न्यायालयात त्यांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जानव्ही केळकर यांनी याबाबत फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

 

Web Title : Pune Crime | Court orders to file charges against 43 lakh, 5 people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMRDA | पीएमआरडीएच्या विकासआराखड्यावर आतापर्यंत 26 हजार हरकतीAir pollution |

रिपोर्टमध्ये झाला आश्चर्यकारक खुलासा ! वायु प्रदूषणामुळे भारतातील लोकांचे वय होतंय 9 वर्षांनी कमी

Gold Price Today | सोन्यात घसरणीचा कल सुरूच, चांदीही झाली 515 रुपये स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर