Pune Crime Court | पुणे : मुनोत शिक्षण संस्थेचे सचिव निखिल मुनोत यांना अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Court | कात्रज कोंढवा (Katraj Kondhwa Road) येथील प्रसिद्ध शैक्षणिक संकुल असलेले स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेचे सचिव निखिल मुनोत यांनी संस्थेतील शिक्षकास जाती वाचक शिवागाळ करणे व तसेच संस्थेतील शैक्षणिक कामकाजा व्यतिरिक्त इतर कामकाज लावणे व वेठबिगारी सारखे राबून घेतल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निखिल मुनोत यांना विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर नरवडे यांनी जामीन मंजूर केला असल्याची माहिती अ‍ॅड. राकेश सोनार (Adv Rakesh Sonar) यांनी दिली.

याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करून सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांनी आरोपी निखिल मुनोत यांना अटक केली. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपासा करून आरोपी मुनोत यांची न्यायालयीन कोठडी मध्ये रवानगी केली होती. निखिल मुनोत यांनी ॲड. राकेश सोनार यांच्यामार्फत विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात जमिनीसाठी अर्ज केला होता.(Pune Crime Court)

ॲड. राकेश सोनार यांनी आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना न्यायालयास दाखवून दिले की, ज्याप्रकारे फिर्यादीने
एफआरआय मध्ये सांगितलेली एक ही गोष्ट यात कोणत्याही कायदेशीर तथ्य नाही, आणि सदरच्या संस्थेत निखिल मुनोत
यांच्याकडून कोणत्याच प्रकारचे जातीवाचक शिवीगाळ केली नव्हती.
तसेच शैक्षणिक कामकाजा व्यतिरिक्त इतर कोणतेही अनुचित प्रकार व बेकायदेशीर काम फिर्यादी यांना करायला कधीच लावले नव्हते.
फिर्यादी यांनी शैक्षणिक संस्थेत कशा प्रकारे अश्या प्रकारचे वाद निर्माण करून संस्थेची बदनामी करता येईल ह्याच गोष्टीचा
विचार करून फिर्यादी यांनी शैक्षणिक संस्थेचे सचिव निखील मूनोत यांच्याविरुद्ध ही खोटी तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य आढळून येत नाही.
असा युक्तीवाद ॲड. राकेश सोनार केला. ॲड. सोनार यांचा युक्तीवाद गृहीत धरून विशेष न्यायाधीश एस.आर नरवडे
यांनी आरोपींला 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर व इतर अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला.

या प्रकरणा मध्ये ॲड. राकेश सोनार यांना, ॲड. उमंग यादव, ॲड. कुमार खराडे, ॲड. प्रज्वल पवार, ॲड. ऋतिक जाधव
व ॲड. ओंकार विर, ॲड. शाक्य सुवी यांनी सहकार्य केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar-Sanjog Waghere | ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे थेट अजितदादांच्या पाया पडले, लग्न सोहळ्यात झाली भेट, पण दादांनी आशीर्वाद दिला का?

Pune Lok Sabha | पुण्यात ठाकरेंच्या सभास्थळावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद?, धंगेकरांच्या प्रचारापेक्षा आगामी निवडणुकांचा विचार जास्त

Shirur Lok Sabha | डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात ! शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

Supriya Sule – Pune Traffic Jam | पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुप्रिया सुळेंनी असा काढला मार्ग, चक्क दुचाकीचा आधार घेत गाठले इच्छित स्थळ, PHOTO व्हायरल