Gajanan Marne Gang | कुख्यात गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून वर्षभरात 56 जणांवर MPDA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Gajanan Marne Gang | कुविख्यात गुन्हेगार गजा मारणे उर्फ महाराज (Gangster Gajanan Marne) याच्या टोळीतील गुन्हेगार पप्पू उर्फ अविनाश वसंत कडू Pappu alias Avinash Vasant Kadu (36, रा. गल्ली नं. 4, म्हातोबानगर, कोथरूड, पुणे) यांच्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी एमपीडीए Maharashtra Prevention of Dangerous Activities (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई (Pune Crime) केली आहे. (Gajanan Marne Gang)

 

कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील (Gangster Gaja Alias Maharaj Marne) पप्पू उर्फ अविनाश वसंत कडू याच्यावर वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई (Corrective and Preventive Actions) करून सुध्दा त्याच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे (Pune Criminals). कडू याने त्याच्या साथीदारांसह कोथरूड पोलिस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीमध्ये कोयता, सत्तूर, सुर्‍या सारख्या घातक व जीवघेण्या हत्यारांसह खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, जाळपोळ करून नुकसान करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Pune Police Action On Gajanan Marne Gang) केलेले आहेत. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspcetor Mahendra Jagtap), पीसीबी (गुन्हे) वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी गुन्हेगाराच्या रेकॉर्डची पडताळणी केली. पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांच्या पप्पू कडू याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला होता. (Gajanan Marne Gang)

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी पप्पू उर्फ अविनाश वसंत कडू याच्यावर एमपीडीए (MPDA Act)
अंतर्गत कारवाई करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी रवानगी केली आहे.
मागील वर्षभरात आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 56 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबध्द केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta Action Maharashtra Prevention of Dangerous Activities (MPDA) on Gangster Gajanan Marne Gang member Pappu alias Avinash Vasant Kadu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Uddhav Thackeray | ‘थप्पड से डर नही लगता प्यार से लगता है’; CM उद्धव ठाकरेंची चौफेर टोलेबाजी

 

Best Multibagger Stock of 2022 | ‘या’ आयटी स्टॉकने तीन महिन्यात दिला 650% रिटर्न, 1 लाखाचे झाले 7.5 लाख रुपये

 

Nitin Gadkari | वाहनचालकांना दिलासा ! नितीन गडकरी म्हणाले – ‘ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर’