Pune Crime | पुण्यातील सराईत वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 49 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) अलंकार पोलीस ठाण्याच्या (Alankar Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 49 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार प्रवीण तुकाराम कुडले Praveen Tukaram Kudle (वय-29 रा. क्रांतीसेन कमानी शेजारी, सुतारदरा, कोथरुड, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे (criminal) नाव आहेत. प्रवीण कुडले याला एमपीडीए कायद्यान्वये येरवडा कारागृहात (Yerawada Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

कुडले हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह कोथरुड (Kothrud Police Station), उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttamnagar Police Station) हद्दीत तलवार, कोयता, चाकू, सुरा यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे, दंगा, मारामारी, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 4 गंभीर गुन्हे अलंकार पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन गुन्हेगारावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. अलंकार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बर्गे (senior police inspector Santosh Barge), पोलीस निरीक्षक संगिता पाटील (Inspector of Police Sangita Patil) व पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 49 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta takes action against 49 under MPDA Act pune police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

नोकरी बदलल्यानंतर EPFO मध्ये नोंदवली नाही Date of Exit, तर स्वत: करू शकता अपडेट; जाणून घ्या प्रोसेस

Keshav Upadhye | केशव उपाध्ये यांचा खा. सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले – ‘ताई, मन मोठं करा, हा सल्ला अजित पवारांना द्या’

Omicron Covid Variant Pune | कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘…तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार’ (व्हिडीओ)