Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार गणराज उर्फ अण्णा ठाकर एक वर्षासाठी स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 72 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibvewadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगार गणराज उर्फ अण्णा सुनिल ठाकर (Ganraj alias Anna Sunil Thacker) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 72 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार गणराज उर्फ अण्णा सुनिल ठाकर (वय – 21 रा. व्हीआयटी कॉलेज जवळ, बिबवेवाडी) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहे. अण्णा ठाकर याला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

गणराज उर्फ अण्णा ठाकर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याने त्याच्या साथीदारांसह बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. त्याच्या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

गणराज उर्फ अण्णा सुनिल ठाकर याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ठाकर याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior Police Inspector Vilas Sonde),
पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude)
यांनी ही कामगिरी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta takes action against 72 pune criminals under MPDA Act till date

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा