Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी मुंबई कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 78 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) कोथरुड पोलीस ठाण्याच्या (Alankar Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार ऋषिकेश ठाकुर याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 78 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार ऋषिकेश राजेंद्र ठाकुर Rishikesh Rajendra Thakur (वय-23 रा. माताळवाडी फाटा, भुगांव, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. ऋषिकेश ठाकुर याला एमपीडीए कायद्यान्वये मुंबई मध्यवर्ती कारागृहात (Mumbai Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

ऋषिकेश ठाकुर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह कोथरुड व सुतारदरा
भागात तलवार, कोयता, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder),
दरोड्याचा प्रयत्न (Attempted Robbery), दुखापत, दंगा, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर मागील 5 वर्षात 4 गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत.
आरोपींच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या भागातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
ऋषिकेश ठाकुर याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप
(Senior Police Inspector Mahendra Jagtap), पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta takes action against 78 criminals under MPDA Act till date

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur ACB Trap | भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागणाऱ्या लिपिकावर एसीबीकडून FIR

Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात बारामतीचे तत्कालीन DySP नारायण शिरगावकर आणि पो. नि. भाऊसाहेब पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; सध्या पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले ACP शिरगावकार म्हणाले….

Pune Yevlewadi DP | येवलेवाडीचा विकास आराखडा जागांची मालकी पाहूनच केल्याची जोरदार चर्चा; भूसंपादन झालेले नसतानाही कात्रज-कोंढवा रस्ता – टिळेकरनगर – पानसरेनगर डी.पी. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू