Pune Crime | पुण्यात क्रेडीट कार्डद्वारे एकाची 3.2 लाखाची फसवणूक, 4 परप्रांतियांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील एकाची क्रेडीट कार्डद्वारे (Credit card) फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगाल (West Bengal), गुजरात (Gujarat) आणि आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) बँक खातेधारकांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आली आहे. आरोपींनी 3 लाख 19 हजार 806 रुपयांची फसवणूक केली आहे.

मोनाफल्ली शेख (रा. वेस्ट बंगाल), रजपुत शिवकुमार रनविजय (रा. सुरत, गुजरात), समीर अक्तर, लोया साई किशोर (रा. आंध्रप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
महेश आनंदा कामठे (वय-32 रा. तिरंगा चौक, भारती विद्यापीठ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कामठे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांविरोधात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे (Kotak Mahindra Bank) क्रेडीट कार्ड व स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) क्रेडीट कार्ड आहेत.
ते दोन्ही क्रेडीट कार्डसची सर्व डिटेल्स क्रेड अ‍ॅप (Cred app) या अ‍ॅपवर अपलोड करुन त्याद्वारे सर्व पेमेंट करतात. त्यांनी अ‍ॅपवरुन बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यातून 89 हजार 949 रुपयांची रक्कम भरली होती.

 

पैसे भरल्यानंतर फिर्यादी यांना कोणताही एस.एम.एस आला नाही.
त्यांनी अ‍ॅपच्या कस्टमर केअर (Customer care) क्रमांकावर साधला.
त्यावेळी समोरच्या व्यक्तीने ईमेल आयडी दोन्ही बँकेच्या क्रेडीट कार्ड वरील कार्ड नंबर,
कार्डची एक्सपायरी डेट व गुगल सिक्युरिटी कोड अशी माहिती भरण्यास सांगितले.
माहीती क्रेड अ‍ॅपवरील अ‍ॅड्रेस मेन्यु मध्ये टाईप करुन भरताच त्यांनी फिर्यादीच्या जी मेल अकाउंट पासवर्ड त्याच्याकडील मोबाईल रिसेट करण्यास सांगितले.
आरोपींनी मोबाईल फोन आणि जी मेल अकाउंट हॅक करुन त्याद्वारे फिर्यादी यांचे 3 लाख 19 हजार 806 रुयांची रक्कम काढून घेतली.
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Credit card fraud of Rs 3.2 lakh in Pune, FIR against 4

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Anti Corruption | 5000 रुपयाची लाच घेताना शिरूर येथील भूकरमापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pari Paswan | ‘कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून अश्लिल चित्रफीत तयार केली; ‘या’ मिस इंडिया युनिव्हर्सचा आरोप

Pune Rural Police | महिला पोलिसांना 8 तास ड्युटी ! पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. देशमुख यांचा ‘अभिनव’ उपक्रम