Pune Crime | गाई चरण्यावरुन वनरक्षकाला बेदम मारहाण, 7 ते 8 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वनविभागाच्या (Forest Department) हद्दीमध्ये गाई चरण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून सात ते आठ जणांनी वनरक्षकाला (Forester) बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. याप्रकरणी 7 ते 8 जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसर येथील स.नं.68 वनविज्ञान केंद्र येथे बुधवारी (दि.17) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

विशाल यादव Vishal Yadav (वय-38 रा. रामोशीवाडी, गोखलेनगर, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यादव यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यादव हे वन विभागामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीचे संरक्षण, रोपांचे संरक्षण व संवर्धन, अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हडपसर येथील वनविज्ञान केंद्रामध्ये शासकीय कर्तव्यावर असताना गुरे चरण्यासाठी आरोपी आले होते. त्यावेळी त्यांनी हटकले. याचा राग आल्याने आरोपीने साथीदारांना बोलावून घेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन मारहाण (Pune Crime) केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट (PSI Chaitrali Gapat) करत आहेत.

 

Web Title : Pune Crime | crime against seven or eight people for beating a forest officer kondhwa police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ