Pune Crime | पुण्यातील कर्वेनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील कर्वेनगर परिसरात घरफोडी (Burglary) करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने (Crime Branch Unit 3) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून 5 लाखाचे सोन्या – चांदीचे दागिने (Gold -Silver Jewellery) जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने 28 जुलै रोजी कर्वेनगर परिसरातून (Pune Crime) दोघांना अटक केली.

 

सुहास चंद्रकांत दिघे Suhas Chandrakant Dighe (वय – 30 रा. एरंडवणा, पुणे), अनिल बाबु बावधने Anil Babu Bawdane (वय – 23 रा. वारजे जकातनाका, कर्वेनगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी कर्वेनगर परिसरात (Karvenagar) येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशीमध्ये आरोपींनी कर्वेनगर परिसरात घरफोडी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी (Pune Police) आरोपींकडून 5 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या – चांदीचे दागिने जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More),
पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप (PSI Gunga Jagtap), अजितकुमार पाटील (PSI Ajit Kumar Patil), पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, शरद वाकसे, संजीव कळंबे, किरण पवार, सुजित पवार, सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, प्रताप पडवाळ, सतीश कत्राळे, राकेश टेकावडे, गणेश शिंदे, साईनाथ पाटील, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : –  Pune Crime | Crime branch arrested two house burglars in Punes Karvenagar area confiscated valuables worth 5 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा