Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरोडा (robbery) टाकून लुटमार करण्याच्या तयारी असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट चारच्या (Crime Branch Unit 4) पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई सेनापती बापट रोडवरील (Senapati Bapat Road) समर्थ रिक्षा स्टँड जवळ मंगळवारी (दि.24) रात्री पावणे दहाच्या सुमारास केली. पोलिसांनी 4 जणांना अटक (Arrest) केली असून एकजण फरार झाला आहे.

साकिब अन्सारी (वय-23), दानिश शेख (वय-22), सलमान अलवी (वय-26), वसिम अन्सारी (वय-24 रा. नागपुर चाळ, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोहम्मद अन्सार हा फरार झाला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक विशाल कुमार शिर्के (Vishal Kumar Shirke) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील शैलेंद्र सोसायटी जवळ असलेल्या समर्थ रिक्षा स्टँडजवळ पाच जण दरोडा टाकून लटुमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथिदार पळून गेला. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे लोखंडी सुरे, तलवार, कटावनी, मोबाईल, रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.

हे देखील वाचा

Salman Khan | एयरपोर्टवर सलमान खानला रोखण्याच्या प्रकरणात देशातील 2 प्रमुख वृत्तपत्र ‘गोत्यात’, फेक न्यूज पसरवण्याचा आरोप; आता CISF ने स्वत: सांगितले ‘सत्य’

Nagpur News | देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत भावाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

High Court | विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची नाही आवश्यकता – हायकोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Crime Branch arrests gang preparing for robbery

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update