Pune Crime | पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना गुन्हे शाखेकडून अटक, 32 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नाशिक येथून पुण्यात (Pune Crime) गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून पोलिसांनी टेम्पो आणि 71 किलो 755 ग्राम गांजा असा एकूण 32 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.11) सकाळी साडे सहाच्या सुमारास लोहगाव वाघोली रोडवर (Lohgaon Wagholi Road) करण्यात आली. (Pune Crime | Crime Branch arrests two smugglers for selling cannabis in Pune, seizes Rs 32 lakh)

प्रविण बाळासाहेब वायसे (वय-31 रा. उत्तमनगर, नाशिक), योगेश शशिकांत महाजन
(वय-25 रा. पाथर्डी फाटा, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायसे याचा स्वत:च्या मालकीच्या टेम्पो आहे.
त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल भरुन तो बाहेरील राज्यात पोहचवण्याचे काम करतो.
तर महाजन हा त्याच्या टेम्पोवर काम करतो.

दरम्यान, टेम्पोमधून दोघांनी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथुन गांजा आणला असून ते
नाशिक (Nashik) येथून गांजा विक्री करण्यासाठी पुण्यात येणार असल्याची
माहिती पोलीस अंमलदार चेतन गायकवाड (Chetan Gaikwad) यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली लोहगाव रोडवर सार्वजनीक ठिकाणी एक टाटा अल्ट्रा टेम्पो
(एमएच 15 जीव्हि 708) पकडला. त्यावेळी टेम्पोमध्ये गांजा असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून 71 किलो 755 ग्रॅम वजनाचा 14 लाख 35 हजार रुपयांचा गांजा,
18 लाखांचा टेम्पो असा एकूण 32 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), प्रभारी अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके
(Additional Commissioner of Police Bhagyashree Navatke), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे(DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर (Police Inspector Prakash Khandekar), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुंखे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Crime Branch arrests two smugglers for selling cannabis in Pune, seizes Rs 32 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या वॉचमनला गुन्हे शाखेकडून अटक

Maharashtra Rains | ठाणे, पुणे आणि कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा; रत्नागिरीत ‘Orange Alert’ जारी

Kirit Somaiya | ‘शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादीचा मंत्री रडारवर’, किरीट सोमय्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट