Pune Crime | व्हॉट्सअ‍ॅप द्वारे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, परराज्यातील दोन मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत परराज्यातील दोन मुलींची सुटका करण्यात आली. तर एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. ही करावाई (Pune Crime) खराडी परिसरातील लॉजमध्ये करण्यात आली.

 

परराज्यातील मुलींना व्हॉट्सअ‍ॅप द्वारे संपर्क करुन त्यांना जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी पुण्यात बोलावून घेऊन त्यांना वेश्याव्यवसायाकरीता पुरवले जात असल्याची माहिती समाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी या गुन्ह्यातील एजंटच्या नंबरची माहिती मिळवली. पथकाने बनावट ग्राहकाकडून एजंला फोन करुन मुलींबाबत विचारणा केली. (Pune Crime)

एजंटने खरडी परिसरातील लॉजमध्ये दोन रुम बुक करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या नावाने दोन रुम बुक केल्या. काही वेळाने एकजण दोन मुलींना दुचाकीवरुन घेऊन आला. त्याने दोन मुलींना सोडल्यानंतर पोलिसांनी एजंटला ताब्यात घेतले. तर बनावट ग्राहकाच्या रुममध्ये मुली गेल्यानंतर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या दोन मुलीपैकी एक जण मध्य प्रदेश तर दुसरी उत्तर प्रदेशातील आहे. अटक करण्यात आलेल्या एजंटवर आणि त्याच्या इतर दोन साथिदारांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील,
अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाब कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, प्रमोद मोहिते,
इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, संदिप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Crime branch busts WhatsApp Prostitution racket, frees two girls from other state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत