Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 23 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार (Gambling Den), पंती पाकुळी सोरट अड्ड्यावर (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) छापा टाकला. पोलिसांनी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 23 जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.8) करण्यात आली.

सिंहगड रोड परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही जण बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी काही जण बेकायदेशीर मटका, पंती पाकुळी सोरट जुगार पैसे लावून खेळत व खेळवत होते. पथकाने 23 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगारातील रोख रक्कम, मोबाइल, जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 31 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी 23 जणांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) महाराष्ट्र जुगारबंदी
अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपासासाठी आरोपींना सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे,
अजय राणे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Crime Branch raids a gambling den in Sinhagad Road police station limits; Action against 23 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Inter Caste Marriage | आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आता पोलीस पुरवणार सुरक्षा

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम