Pune Crime | पत्त्याच्या क्लबवर गुन्हे शाखेचा छापा, 12 जण ताब्यात

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेकायदेशीर सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर (Club) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (दि.12) स्वारगेट येथील सोनिया गांधी नगर झोपडपट्टीतील (Sonia Gandhi Nagar Slum) एका मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 15 हजार रुपयांची रोकड (Pune Crime) जप्त केली.

सोनिया गांधी झोपडपट्टीतील नाल्याच्या कडेला मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे 52 पत्त्यांचा पैशावर रमी हा जुगार खेळत (Rummy Gambling) असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. पथकाने पाळत ठेवून त्याठिकाणी छापा टाकला असता 10 जण रमी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांना त्याब्यात घेऊन त्यांच्याकडून 15 हजार 490 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. (Pune Crime)

जुगार अड्ड्याबाबत (Gambling Den) माहिती घेतली असता हा जुगार अड्डा दोन जण चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ताब्यात घेतलेल्या 10 आणि जुगार अड्डा चालवणाऱ्या 2 असे एकूण 12 जाणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस
निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके
(PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, पुष्णेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Crime Branch raids address club, 12 people detained

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Eggs And Cholesterol | अंडे हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवते का? जाणून घ्या कोणते फूड्स आजपासूनच डाएटमधून हटवले पाहिजेत

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! बनावट कागदपत्राद्वारे शिपायाने दिले कंत्राटी ग्रामसेवक भरतीचे आदेश, दापोडी उपनिबंधक कार्यालयातील प्रकार