Pune Crime | कोथरुड परिसरात जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा, 35 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील कोथरुड परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टकला. या कारवाईत आरोपींकडून 1 लाख 12 हजारांची रोकड, 35 मोबाइल असा ऐवज जप्त (Pune Crime) करण्यात आला.

कोथरूड परिसरातील जिजाईनगर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवुन छापा टकाला असता जुगार पैसे लावून खेळवत व खेळत असलेल्या 35 जणांना ताब्यात घेतले. 35 जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये (Maharashtra Gambling Prevention Act) कारवाई केली. (Pune Crime)

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar), सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), राजेंद्र कुमावत, अजय राणे, प्रमोद मोहिते, मनीषा पुकाळे, नीलम शिंदे यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Crime branch raids gambling dens in Kothrud area, FIR against 35 people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा