Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेली अंतरराज्य टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 20 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पेट्रोल पंपावर (Petrol Pump) दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली. पोलिसांनी 7 जणांच्या टोळीला अटक (Arrest) करुन त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई गुरुवारी (दि.18)  मंगळवार पेठेत सापळा (Pune Crime) रचून केली.

 

अशोककुमार दिनेश महातु (वय-35 रा. फुलकाहा, ता. कन्होळी, जि. सितामाली, बिहार), आझादकुमार रमेशकुमार महातु (वय-25 रा. ममलखा, ता. घोघा, जि. भागलपुर, बिहार), विजय गगनदेव महातु (वय-29 रा. गांधीनगर, जुनी दिल्ली), अबोधकुमार चालीतर महातु (वय-19 रा. श्रीनगर छरापट्टी, बेगूसराय, बिहार), चंदनकुमार फेनतुस महातु (वय-22 रा. मुकबिरा चायटोला, जि. मुगेर, बिहार), अनिवाशकुमार धिरेंनदर रवि (वय-22 रा. बिष्णुपुर आधार, जि. सितामडी, बिहार), सुरेशकुमार नथुनी महातु (वय-20 रा. नंदरामपाल, नवी दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार अनिकेत बाबर (Aniket Babar) यांना पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले काहीजण मंगळवार पेठेतील सार्वजनिक रोडवर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध कंपनीचे 8 मोबाईल, कोयते, चाकु, सत्तुर, मिरची पुड, नायलॉन दोरी असा एकूण 94 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये आरोपींनी दिल्ली (Delhi), हैदराबाद (Hyderabad), पुणे (Pune), मुंबई (Mumbai), गुजरात (Gujarat) असा रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांचे चोरलेले 1 लाख 7 हजार रुपये किमतीचे 20 मोबाइल फोन जप्त केले. यापैकी दोन मोबाईल पुणे शहरातून (Pune City) चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. ही टोळी रेल्वे प्रवासात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणारी अंतरराज्य टोळी (Interstate Gang) आहे. तसेच आरोपींनी हैदराबाद, गुजरात, मुंबई, दिल्ली येथे  मोबाईल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी (Pune Police) वर्तवली आहे. आरोपी विजय गगनदेव महातु आणि अशोक कुमार महातु यांच्याविरुद्ध दिल्ली आणि सिकंदराबाद येथील पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी व जबरी चोरीचे 8 गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale),
सहायक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर (API Ashish Kavathekar),
उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad),
पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, अभिनव लडकत, शुभम देसाई,
निलेश साबळे, विठ्ठल साळुंखे, अजय थोरात, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, रुक्साना नदाफ यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Crime branch seizes 20 mobile phones from Gajaad, inter-state gang preparing for robbery

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवार सत्ताधारी आमदारावर भडकले; म्हणाले – ‘अरे थांब ना बाबा.. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?’

 

Chandrakant Patil | ‘त्या’ विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तरपर्यतची फी राज्य सरकार भरणार – चंद्रकांत पाटील

 

Dhananjay Munde | CM शिंदेंनी स्वत:चाच निर्णय फिरवल्यावरून धनंजय मुंडेंचा टोला