पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळवून नेत तिच्यावर लैगिक अत्याचार (Sexual Abuse) करणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी (Pune Police) सापळा रचून अटक (Arrest) केली. आरोपी गेल्या नऊ महिन्यापासून (Pune Crime News) पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी रांजणगाव, बारामती, डाहाणू पालघर, गुजरात बॉर्डर येथे मुलीसह लपून बसला होता. पुण्यात मित्राला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा (FIR) दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस शोध घेत होते. मात्र, तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपीचा सोशल मीडियाच्या (Social Media) आधारे तांत्रीक विश्लेषण करुन तपास सुरु केला असता तपास पथकाला आरोपी डहाणू पालघर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक त्याठिकाणी गेले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून फरार झाला. (Pune Crime News)
दरम्यान, आरोपी लक्ष्मीनारायण टॉकीज (Lakshmi Narayan Talkies), पर्वती पुणे येथे मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे, सद्दाम शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (दि.26) चारी बाजूने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त सहेल शर्मा (DCP Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomene),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), पोलीस अंमलदार कुंदन शिंदे,
प्रशांत शिंदे, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, नवनाथ भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे,
प्रकाश मरगजे, प्रमोद भोसले, किशोर वळे, अमोल दबडे, अनिस तांबोळी, अमित चिव्हे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | Dattawadi police handcuffed the absconding accused in the crime of child sexual abuse, Gungara was serving the police for 9 months
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…