Pune Crime | फेकलेले गरम ताट 3 वर्षाच्या बाळाच्या अंगावर पडले अन्…; सिद्धार्थनगरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात पतीने जेवणाचे गरम ताट फेकले, ते झोपलेल्या ३ वर्षाच्या बाळाच्या अंगावर जाऊन पडले. त्यावरुन जाब विचारल्याने त्याने घरातील लोकांना मारहाण करुन जखमी केले. दापोडीमधील सिद्धार्थनगर (Siddharth Nagar Dapodi) येथे ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. (Pune Crime)

याप्रकरणी २१ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात Khadki Police Station ( गु. रजि. नं. १०९/२२) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषिकेश अरुण भिसे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश भिसे व त्याची पत्नी पल्लवी यांच्यात भांडणे झाली. या भांडणामध्ये ऋषिकेश याने पत्नीच्या अंगावर जेवणाचे गरम ताट फेकून मारले. ही ताट बाजूला झोपलेल्या ३ वर्षाच्या त्यांच्या बाळाच्या अंगावर जाऊन पडले. त्यावेळी फिर्यादी, तिचे पती व सासू यांनी ऋषिकेश याला कशाला भांडणे करतोस, बाळाकडे बघ जरा, असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने दरवाजाला लावलेली वीट उचलून फिर्यादी मानसीचे पती निखिल याच्या डोक्यात मारली. त्यांच्या मुलीच्या पायावर मारुन जखमी केले. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला धक्काबुक्की करुन मारहाण करुन शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक भांबड तपास करीत आहेत.

Web Title : Crime News In Siddharth Nagar Dapodi Khadki Police Station Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI