Pune Crime | पुण्यात स्नॅक सेंटरसाठी खर्च केलेले 2 लाख रुपये मागणार्‍यावर खंडणीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Crime | स्नॅक सेंटर चालविण्यावरुन झालेल्या वादानंतर महिलेने स्नॅक सेंटर सोडून दिले. मात्र, तिच्या मुलाने या सेंटरसाठी खर्च केलेले २ लाख रुपये घेण्यासाठी जागा मालकाला फ्लॅट पाहिजे असल्याचे भासवून महिलेच्या नावाने फोन करुन बोलावून घेऊन धमकी दिल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी निखील प्रकाश भगत (वय ४०, रा. सनश्री सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी करण वाझ (वय २० व इतर तिघांविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगत यांचे मिसाळ दरबार नावाचे हॉटेल आहे.
या हॉटेलमध्ये त्यांनी जेवण व स्नॅक असे दोन भाग केले होते. स्नॅक सेंटर चालविण्यासाठी त्यांनी मिली डी वाझ यांच्याबरोबर ११ महिन्यांचा करार केला होता.
मात्र, तीन महिन्यात त्यांच्यात वाद झाला. तेव्हा मिली वाझ यांनी स्नॅक सेंटर खाली करुन निघून गेल्या.
त्यावेळी त्यांचा मुलगा करण वाझ याने फिर्यादी यांना स्नॅक सेंटरला खर्च केलेले २ लाख रुपये मागण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला.
आरोपीने फिर्यादीस आरती नावे महिलेच्या फोनवरुन फोन करुन या महिलेस फ्लॅट पाहिजे
असल्याचे भासवून फिर्यादीस रहेजा व्हिस्टा चौकात ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजता बोलावले.
फिर्यादी तेथे गेल्यावर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन २ लाख रुपयांची खंडणी मागितली.
फिर्यादीने आता तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Crime of ransom against a person who demanded Rs 2 lakh spent for a snack center in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anil Deshmukh | …अन् रात्री साडेबाराच्या दरम्यान देशमुखांना अटक करण्याचा निर्णय झाला

Police Recruitment | पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबर नंतर होणार 13000 साठी भरती, जाणून घ्या सविस्तर

Sameer Wankhede Property | समीर वानखेडेंची ‘इतकी’ आहे संपत्ती ! जाणून घ्या कुठं किती एकर जमीन अन् किती फ्लॅट