Pune Crime | सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांकडून अटक; पिस्टल, काडतुसे जप्त

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | सराईत गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे (pistol and Cartridges seized) जप्त करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिसांनी ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) अरणेश्वर येथील रिक्षा स्टँडजवळ मंगळवारी (दि.17) केली. अनिल सुधाकर भोमकर (वय-53 रा.शिवदर्शन पर्वती, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्यातील (Sahakar Nagar Police Station) तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार सागर सुतकर (Sagar Sutkar) यांना अरणेश्वर (Araneshwar) येथील अण्णाभाऊ साठे नगर मधील रिक्षा स्टँडजवळ एक सराईत थांबला असून त्याच्याकडे पिस्तुलासारखे हत्यार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अनिल भोपकर याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असताना त्याच्या कमरेला असलेली देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे असा एकूण 30 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग
सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan), सहकार नगर पोलीस ठाण्याच्या
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस. घाडगे (PSI S.S. Ghadge),
पोलीस हवालदार बापु खुटवड, पोलीस नाईक भुजंग इंगळे, सुशांत फरांदे,
पोलीस शिपाई सागर सुतकर, महेश मंडलिक, महादेव नाळे, सागर शिंदे, शिवलाल शिंदे, प्रदिप बेडीस्कर यांनी केली.

 

Web Title : Pune Crime | criminal arrested by Sahakarnagar police; Pistols, cartridges seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | खळबळजनक ! पुणे पोलिस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी

Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

MNS Vs Sambhaji Brigade | मनसे-संभाजी ब्रिगेड आमने-सामने, राज ठाकरेंना दिलं चर्चेच निमंत्रण