Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी केले अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | तडीपार केले असतानाही पुणे शहरात आलेल्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) पथकाने अटक (Pune Crime) केली आहे.

सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (वय 27, रा. सध्या अहमदनगर, मुळ रा. राजेवाडी, नाना पेठ) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे.
समर्थ पोलीस ठाण्याचे (Samarth Police Station) तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना तडीपार गुंड मट्या हा निशांत टॉकीजसमोर रस्त्यावर थांबला असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांना याची माहिती सांगून पोलीस पथकाने निशांत टॉकीजसमोर जाऊन सुशांत कुचेकर याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
सुशांत कुचेकर याला 20 डिसेंबर 2019 रोजी 2 वर्षांकरीता पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

 

परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (deputy commissioner of police priyanka narnaware), फरासखाना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर
(assistant commissioner of police satish govekar), समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (senior police inspector vishnu tamhane),
पोलीस निरीक्षक उल्हास कदम (police inspector ulhas kadam) यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे (Assistant Police Inspector Sandeep Jore) , पोलीस अंमलदार सुमित खुट्टे, विठ्ठल चोरमले, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे,
हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, सुनिल हासबे, महेश जाधव, नितीन घोसाळकर,
श्याम सूर्यवंशी, वनिता गोरे, यांनी ही कामगिरी केली.

 

Web Title : Pune Crime | criminal arrested by Samarth police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 55 जणांना कारवाई; 31 कोयते, 4 तलवार, 1 पालघन, 1 सुरा जप्त

Mumbai High Court | पुण्यातील महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प व्यवहार्य आहे का? – उच्च न्यायालयाचा सवाल

Dowry in Rural India | हुंडा देऊन झाले ग्रामीण भारतात 95% विवाह, डोळे उघडणारा जागतिक बँकेचा ‘हा’ अहवाल – स्टडी