क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा वारजे पोलीस चौकीत आत्महत्येचा प्रयत्न; दारू पिऊन केला ‘राडा’, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | सराईत गुन्हेगाराने दारुच्या नशेत पोलीस चौकीत येऊन खिडकीच्या काचा हाताने फोडल्या असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. वारजे पोलीस चौकीत (Warje Police Chowki) झालेल्या या खळबळजनक प्रकाराबद्दल पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न (Attempt to Suicide) केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

मंगेश विजय जडीतकर (वय २१, रा. पारुदत्त कॉम्प्लेक्स, दांगट पाटील नगर, वारजे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (Deenanath Mangeshkar Hospital Pune ) उपचार करण्यात येत आहे.

मंगेश जडीतकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वारजे माळवाडीत (Warje Malwadi) एका टेम्पोचालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) मंगेश जडीतकर व त्याचा साथीदार गौरव पासलकर या दोघांना मार्चमध्ये अटक केली होती. त्यानंतर तो सध्या जामीनावर सुटला होता.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जनार्धन होळकर (PSI Janardhan Holkar) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगेश जडीतकर हा शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत वारजे पोलीस चौकात आला होता. त्याने तेथे येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करुन “माझी तक्रार घ्या मला ओळखत नाही का मी गुन्हेगार आहे. मला मंगेश् जडीतकर म्हणतात, मी आता जीव देतो,” असे म्हणू लागला. तेव्हा होळकर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलीस चौकीच्या खिडकीच्या काचा हाताने फोडल्या. त्यात तो जखमी झाला. चौकीसमोर मार्शल ड्युटी करणारे पोलीस शिपाई काटे यांच्या मोटारसायकलच्या स्पीडो मीटरच्या काचेवर धडक (Pune Crime) दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी तातडीने मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अमृत मराठे (police inspector amrut marathe) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Criminal Attempt to suicide at Warje police chowki station in Pune; doing wrong thing after drinking alcohol, huge excitement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये 

Back to top button