Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन फरार झालेली टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibwewadi Police Station) हद्दीत घडली होती. या गुन्ह्यातील फरार झालेल्या टोळीला पुणे पोलिसांनी (Pune Police) 24 तासाच्या आत अटक (Arrest) केली आहे. ही पुण्यातील (Pune Crime) अप्पर इंदिरानगर परिसरात घडली होती.

जुन्या भांडणातून टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला. जखमी तरुणाला वाचविण्यासाठी आलेल्या परिसरातील नागरिकांना आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना पोलीस अंमलदार अतुल महांगडे (Atul Mahangade) व अमित पुजारी (Amit Pujari) यांना आरोपी अप्पर बसडेपो परिसरात असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सौरभ शिंदे, अक्षय अभंग, आकाश गोरड, चंदन राठोड, ऋषिकेश उर्फ किशोर शिंदे यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रक्ताने माखलेली हत्यारे जप्त केली आहे.

 

Web Title : Pune Crime | criminal gang arrested by bibwewadi police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PSI Suspended | पुण्यातील हॉटेलमध्ये पैसे मागणे पडले महागात, पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

RBI Rules | 50 हजारपेक्षा जास्तीचा चेक देणे ठरू शकते अडचणीचे; जाणून घ्या काय आहे RBI चा नवीन नियम?

Pune Crime | पुण्यात पोलिस अधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा, प्रचंड खळबळ

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाल्या…

Worlds Safest City | जगातील सर्वात Safe शहरांमध्ये डेन्मार्कचे Copenhagen पहिल्या नंबरवर, जाणून घ्या दिल्ली अन् मुंबईचा नंबर