Pune Crime | अबब ! नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमधील ‘खजिन्या’चा पर्दाफाश; हिरे, सोनं-चांदी अन् रोकड…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune Crime | अवैध व्याजाच्या व्यवसायातून लोकांच्या जागा व वाहने बळकावण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) याच्या सर्व लॉकर्सची पोलिसांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. सावकारी आणि बळजबरीने लोकांच्या मिळवलेल्या जमिनीतील पैसा लॉकरमध्ये लपवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गायकवाडच्या केवळ दोनच लॉकरची झाडाझडती घेतली असता एका लॉकरमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या विटा, हि-यांचे दागिने, तर दुस-या लॉकरमध्ये पन्नास लाख रुपये रोख आढळून आले. पोलिसांनी (Pune Police) हे सर्व जप्त केले आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये फिर्यादी यांच्याकडून बळजबरीने लिहून घेतलेली कागदपत्रे देखील सापडली (Pune Crime) आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात नानासाहेब शंकरराव गायकवाड व गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड
(Ganesh Nanasaheb Gaikwad) या पिता-पुत्रांवर खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापती साठी पळवून नेणे, दुखापत करणे, बेकादेशीरपणे जमाव जमविणे,
कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्निशस्त्र बाळगणे,
अवैधरित्या सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे (Pune Crime) दाखल आहेत.

त्यांच्यावर दुसऱ्यांदा मोक्काची कारवाई Mokka (MCOCA Action) करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पोलिसांनी नंदा नानासाहेब गायकवाड, सोनाली दीपक गवारे,
(वय ४०) दिपक निवृत्ती गवारे (वय ४५, दोघेही रा. शिवाजीनगर, पुणे), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा. सर्वोदय रेसिडेन्सी, ए विंग, फ्लॅट नं.२,विशालनगर,
पिंपळे निलख, पुणे), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती औंध पुणे)
यांच्यावर देखील गुन्हा केला असून यातील वाळके बंधू मात्र अद्याप (Pune Crime) फरार आहेत.

 

गायकवाड पिता-पुत्रांनी स्वत:स व इतर साथीदारांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी बेकायदेशीपणे पीडितांना व्याजाने पैसे देऊन त्याच्या वसुलीसाठी
जबरदस्तीने जमिनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज, स्टॅम्प पेपर, लिहिलेल्या व को-या पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्हे ते करत होते.
त्यातून त्यांनी जमिनी, वाहने बळकावल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी गायकवाडच्या लॉकरची झाडाझडती घेतली असता खजिनाच बाहेर आला.

 

Web Title : Pune Crime | criminal nanasaheb gaikwads locker full 1 crore gold and 50 lakh cash and other things come out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sharad Pawar | आगामी निवडणूकांच्या संदर्भात शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

Indapur News | इंदापूरात बुरखाधारी महिलांची टोळी चप्पल दुकानात चोरी करताना CCTV कॅमेर्‍यात कैद (CCTV Video)

MPSC Exam | राज्य सेवा परीक्षेच्या जागा वाढवल्या, MPSC कडून नवं परिपत्रक जाहीर