Pune Crime | वारजे माळवाडी पोलिस ‘झोपेत’ ! 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा पोलिस ठाण्यातील सर्वेलन्स रूममधून ‘फरार’; उडाली ‘भंबेरी’

पुणे : Pune Crime | घरासमोर राहणार्‍या अल्पवयीन 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारजे येथील रामनगरमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police) तेथे राहणार्‍या एका 28 वर्षाच्या नराधमाला अटक (Pune Crime) केली आहे.

दरम्यान, वारजे पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी शनिवारी पोलिसांच्या तावडीतून नजर चुकवून पळून गेला आहे. याप्रकरणी या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्याने 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. पोलिसांनी तातडीने या नराधमाला अटक केली आहे. वारजे पोलिसांनी या आरोपीला शुक्रवारी अटक केली होती. तो शनिवारी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला असून वारजे पोलीस तपास करीत आहेत.

आरोपीने शनिवारी पहाटे पोलिस ठाण्याच्या सर्वेलन्स रूममधून धूम ठोकली आहे.
त्यावेळी वारजे माळवाडी पोलीस झोपेत होते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हे देखील वाचा

Thane Crime | काळ्या जादूसाठी वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी ! पोलिसांचा क्लिनिकवर छापा, कथित ‘डॉक्टर’ महिलेसह 3 अटकेत

Pre Wedding Shoot | लोणावळ्यात प्री-वेडिंग शूट करणं पडलं माहागत, ड्रोन शुटिंग  चालकाला अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | criminal run away from warje malwadi police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update