Pune Crime | धक्कादायक ! ‘तू कोण कुठला, PSI तुझ्या घरी, इथं शहाणपणा करायचा नाही, सोड मला तू कमिशनर जरी असला तरी मला काय?; पुण्यात पोलिस उपनिरीक्षकावर उचलला हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला अडवून पोलीस उपनिरीक्षकाची (Police Sub Inspector) गचांडी धरुन हाताने मारहाण करुन आरोपीला पळून जाण्यास मदत करण्याचा प्रकार तुळापूर (Tulapur) येथे घडला. (Pune Crime)

याबाबत लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime) केला असून संपत बबन शिवले Sampat Baban Shivle (वय ४१, रा. तुळापूर) याला अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे (PSI Suraj Gore) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात शस्त्राचा वापर करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यातील आरोपी तेजस साळवे, चंद्रकांत पोपट शिवले, राम पोपट शिवले (सर्व रा. तुळापूर) यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, पोलीस हवालदार पांडुरंग माने, अंमलदार बाळासाहेब तनपुरे हे तुळापूरला शनिवारी दुपारी गेले होते.

भट्टीवस्तीजवळील क्रिकेट मैदानाजवळ त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करत असताना संपत शिवले, राम पोपट शिवले यांनी “तू कोण कुठला, पी एस आय, तुझ्या घरी़ इथ शहाणपणा करायचा नाही़ सोड मला तू कमिशनर जरी असला तरी मला काय” असे म्हणत त्याने फिर्यादीची गचांडी धरुन समोर ओढले. संपत शिवले याने “तू कोण, तुझा काय संबंध” असे म्हणून गोरे यांच्या अंगावर येऊन हाताने मारु लागला. तेव्हा ते बाजूला सरकले असताना त्यांच्या डोळ्यावरील चष्मा खाली पडला. फिर्यादी यांनी “आम्ही पोलीस असून आरोपी ताब्यात घेत आहोत. सरकारी काम चालू आहे. आपणमध्ये पडु नका आम्हास सहकार्य करा,” असे सांगूनही आरे रावी करीत फिर्यादीच्या अंगावर धावून आले. त्यांच्याबरोबरच्या पोलिसांना त्याला मागे ओढून ठेवले तरी देखील शिवीगाळ करुन धमकी दिली. या गडबडीत तेजस साळवे हा पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले (PSI Bhosale) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Criminals in Pune Police Sub Inspector Lonikand Police Station Criminals Beat PSI

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार