Pune Crime | बोपदेव घाटात दाम्पत्याला लुटले, तलवारीने वार करुन मोबाईल, मंगळसुत्र लुबाडले

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बोपदेव घाटात (Bopadev Ghat) रात्रीअपरात्री जाणार्‍या येणार्‍यांना लुबाडले जात असल्याने तेथे पोलीस (Pune Police) चौकीची निर्मिती करण्यात आली. असे असतानाही घाटातून जाताना मोटारसायकल वरुन आलेल्या दोघांना चोरट्यांनी तलवारीने वार करुन जखमी करुन एका दाम्पत्याला लुबाडल्याचे (Pune Crime) समोर आले आहे.

 

याप्रकरणी बाळु बबन जाधव Balu Baban Jadhav (वय 42, रा. गुजरवाडी, कात्रज-Katraj) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळु जाधव हे पुरंदर तालुक्यातील वाघापूर
या मुळ गावी जाण्यासाठी मोटारसायकलवरून पत्नीसह बोपदेव घाटातून बुधवारी रात्री साडेदहा वाजता जात होते.
वाटेत ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले.
त्यांनी तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
तेव्हा बाळु यांनी त्याला प्रतिकार केल्यावर त्यांनी बाळु यांच्या डोक्यात तलवारीने वार करुन जखमी केले.
त्यांच्याकडील मोबाईल आणि पत्नीच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरुन नेले.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे (API Sandeep Madhale) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याच ट्विटची सर्वत्र चर्चा; म्हणाल्या…

 

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

 

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले