Pune Crime | पत्नीचे मेव्हण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीच्या अंगावर ओतले मटणाचे ‘कालवण’; इंदापूरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या पत्नीचे मेव्हण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन झालेल्या वादात पतीने पत्नीच्या अंगावर मटणाचे गरम कालवण टाकले. या प्रकारामुळे पत्नीचे डाव्या खांदयापासून कोपर्‍यापर्यंतचा भाग भाजला आहे. ही घटना इंदापूरमधील सरस्वतीनगर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता (Pune Crime) घडली.

याप्रकरणी २५ वर्षाच्या महिलेने इंदापूर पोलिसांकडे (Indapur Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सकाळी मटणाची भाजी गरम करीत होत्या. त्यावेळी तिचा पती तेथे आला. त्याने तुझे बाहेर संबंध आहेत. तसेच तुझा मेव्हणा याच्याबरोबर अनैतिक संबंध आहेत, असे म्हणाला. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा तिच्या पतीने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तेथेच असलेले मटणाचे गरम कालवण फिर्यादी यांच्या डाव्या खांद्यापासून कोपर्‍यापर्यंत ओतले. गरम कालवणामुळे त्या भाजल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

Web Titel :- Pune Crime | cury of mutton poured on wife’s body on suspicion of having immoral relationship with youth; Incident in Indapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! जर खात्यात अजूनही आले नसतील 2000 रुपये, तर ‘या’ पध्दतीनं करा ‘क्लेम’, जाणून घ्या

PM Awas | पीएम आवास योजनेबाबत तुम्हाला सुद्धा असेल काही अडचण तर ‘इथं’ करा तक्रार; ‘इतक्या’ दिवसात निघेल मार्ग

MEDICINE ATM | खुशखबर ! आता ATM मधून बाहेर पडतील औषधे, प्रत्येक तालुक्यात लावणार मशिन्स, जाणून घ्या मोदी सरकारचा पूर्ण प्लान