Pune Crime | दुबईतून आलेल्या प्रवाशाकडून 26.45 लाखांचं सोनं जप्त, पुणे विमानतळावर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिमाशुल्क विभागाच्या (Pune Customs Department) अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर (Pune International Airport) दुबई (Dubai) येथून आलेल्या प्रवाशाकडून तब्बल 26 लाख 45 हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. मागील दोन ते तीन वर्षात दुबई येथून कच्चा सोन्याच्या तस्करीचे (Gold Smuggling) प्रमाण वाढले आहे. दुबई येथून आलेल्या प्रवाशाकडून 24 कॅरेटचे 500 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि चैन जप्त केल्या (Pune Crime) आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.5) दुबईवरून स्पाईस जेटच्या फ्लाइटने (Spice Jet Flight) आलेल्या एका प्रवाशाला रोखण्यात आले. त्याची अधिक तपासणी केली असता, त्याच्याकडे कच्चा सोन्याच्या बांगड्या (Crude Gold Bangles) आणि चैनीच्या (Chain) रुपात 500 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे तब्बल 26 लाख 45 हजार रुपये किमतीचे तस्करी केलेले सोने आढळून आले. (Pune Crime)

प्रवाशाकडून सर्व सोने जप्त (Gold Seized) करण्यात आले असून प्रवाशासह त्याला विमानतळावर घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सीमाशुल्क कायद्याच्या (Customs Act.) तरतुदीनुसार अटक (Arrest) करण्यात आली आहे. पुढील तपास पुणे पोलीस (Pune Police) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | customs seizes in pune airport 26 45 lakh gold from dubai passengers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा