Pune Crime | गोळीबार करत साडेतीन कोटींची रक्कम लुटली, पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चारचाकीवर गोळीबार (Firing) करत साडे तीन कोटी रुपयांची रक्कम (Amount) लुटल्याचा (Robbed) प्रकार पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway घडला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सहा जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. याबाबत भावेशकुमार अमृत पटेल Bhaveshkumar Amrit Patel (वय-40 रा. पंचरत्न बिल्डिंग, मुंबई, मुळ रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटेल हे आपल्या कारने (टीएस 09 ई.एम. 5417) पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी वरकुटे बुद्रुक (Varkute Budruk) गावच्या हद्दीत वरकुटे पाटी जवळच्या गतिरोधक जवळ गाडीची गती कमी झाली. त्यावेळी पायी चालत आलेल्या चार अज्ञातांनी हातातील लोखंडी टॉमी दाखवत पटेल यांना गाडी थांबवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी घाबरून गाडीचा वेग वाढवला. (Pune Crime)

चोरट्यांनी दुसऱ्या कारमधून पटेल यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांच्या गाडीवर गोळीबार केला.
त्यांनी फिर्यादी यांची गाडी अडवून त्यांच्या गाडीमधील 3 कोटी 60 लाख रुपये घेतले.
तसेच फिर्य़ादी व त्यांच्या सहकाऱ्याला हाताने बेदम मारहाण करुन 14 हजार रुपये व 12 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा
एकूण 3 कोटी 60 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून पळून गेले.
पटेल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून पटेल यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कोठून आणली. ते कोठे निघाले होते याचा तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | dalla was killed by firing at an amount of three and a half crores incident on pune solapur highway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा